Sunday, 12 November 2023

Diwali

 जेव्हा एका स्त्रीचा जन्म होतो तेव्हा लक्ष्मी घरी येते.सुख ,समृध्दी ,शांती ,आरोग्य, समाधान, ऐश्वर्य घेऊन येते लक्ष्मी म्हणजे लक्ष लक्ष योनीतून लक्ष्मी घरी येते.राग ,लोभ, मोह,माया विसरून लक्ष्मीचं स्वागत केले पाहिजे ‌.लक्ष्मी ही नुसती देवी नसून ती एक व्यक्ती आहे मग ती कोणत्याही रूपात प्रकट होते पुरुष असो वा स्त्री.महिलांचा सन्मान नुसता महिला दिनी mother days , वाढदिवस किंवा विशिष्ट सणां पुरता न करता दररोज केला पाहिजे तर खऱ्या अर्थानं लक्ष्मीपूजन होईल. प्रत्येकाच्या विचार आणि बुद्धीत फरक असतो पण कोणता विचार कधी आणि कुठे करायचा? हे आपण लक्षात घ्यायला हवे.नुसतं काही माणसं सांगतात म्हणून आपण आधी नीट वागणाऱ्या माणसांशी वाईट वागू नये. आधी विचार करावा काय झाले? विचारावे मगच निर्णय घेण्यात आला पाहिजे .माणसे आधी ज्या माणसांशी संवाद चांगला ठेवतात नंतर कोणाचं तरी ऐकून चुकीचे समजून त्या व्यक्तीशी वाईट वागतात मग कसली लक्ष्मीपूजन .

लक्ष्मीपूजन म्हणजे माणुसकी नाते माणसाने माणसाशी योग्य रितीने चांगले वागले पाहिजे.एखादा व्यक्ती मदत करायला का नकार देत आहे ते समजून घेतला पाहिजे. चुकीचे समजून घेऊन त्यांच्याशी संवाद तोडणे फोन बंद करणे हे चुकीचे आहे.सण हा साजरा का करता जर तुमच्यात माणुसकी नाते नाही ‌.सण हा केवळ मनोरंजन म्हणून साजरा न करता किंवा दाखवण्यापुरता न करता एक कर्तव्य म्हणून व्यक्ती शी नीट वागता सण साजरा करू नये. ‌सणांचे महत्व म्हणजे सगळे क्लेश भांडण सोडले पाहिजे आणि पुन्हा व्यक्तीशी संपर्क साधला पाहिजे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home